डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु

उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आज सकाळी वातावरण निरभ्र असल्यानं बचावकार्याला वेग आला आहे. गंगोत्री आणि हर्षिल परिसरात वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक अडकले आहेत. त्यातल्या २७४ जणाची सुटका अतापर्यंत करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातले १२३ पर्यटक आहेत. आतापर्यंत हर्षिलमधून १३५ जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यातल्या १०० जणांना उत्तरकाशी इथं तर ३५ जणांना डेहराडूनला नेलं आहे. उत्तराखंड राज्य सरकार, इंडोतिबेटन पोलीस दल, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलं बचावकार्य करत आहेत.

 

राज्य शासनानं पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला असून मदत क्रमांक जारी केला आहे तो याप्रमाणे – ९३२१५८७१४३ क्रमांक पुन्हा एकदा ९३२१५८७१४३

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.