उत्तराखंड मध्ये झालेल्या मुसळधार पावसानं उत्तरकाशी मध्ये हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर गंगोत्री धाम यात्रा बंद करण्यात आली होती, प्रशासनाच्या 35 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर गंगोत्री धाम यात्रेला अधिकृतपणे काल पुन्हा सुरुवात झाली.
प्रशासन आणि सीमा रस्ता सुरक्षा संघटनांच्या मदतीन गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील नुकसान ग्रस्त भागांची दुरुस्ती करून यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. काल संध्याकाळी 100 पेक्षा अधिक भाविकांनी गंगा मातेचं दर्शन घेतलं.