उत्तराखंडमध्ये, चामोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे थरली तालुक्यात मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. थरली तालुका मुख्यालय, केदारबागड, राडीबागड आणि चेपाडोसह अनेक भागांना जोरदार पावसाचा फटका बसला आहे.
निवासी इमारती, दुकानं आणि सरकारी कार्यालयांमध्ये पावसाच्या पाण्याबरोबर आलेला राडारोडा साचला आहे. अनेक वाहनांचंही नुकसान झालं आहे. विविध यंत्रणा मदत आणि बचावकार्यात गुंतल्या आहेत. दरम्यान, उत्तराखंडमध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून, हवामान विभागानं डेहराडून, नैनिताल, बागेश्वर आणि पिठोरागडला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.