उत्तर प्रदेशात गोंडा इथं आज सकाळी झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. पृथ्वीनाथ मंदिरात जाणाऱ्या १५ भाविकांनी भरलेल्या एक बोलेरो गाडीवरचं नियंत्रण सुटून ती रेहरा गावातल्या सरयू कालव्यात पडली. या कालव्यातून ४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.