उत्तरप्रदेशात बाराबंकी इथं औसनेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी झाल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी जमलेल्या गर्दीवर विजेची तार कोसळून ही दुर्घटना झाली. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.
विजेच्या तारांवर वानराने उडी मारल्यामुळे तारा खाली कोसळल्या. त्यामुळे १९ जणाना विजेचा झटका लागला. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.