मुंबई उपनगरीय गाड्या आणि अनारक्षित तिकिटांसाठी वापरलं जाणारं ‘यूटीएस ॲप’ येत्या १ मार्च पासून पूर्णपणे बंद होणार असल्याचा दावा खोटा असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. यूटीएस ॲपवरून फक्त नवीन मासिक पास काढण्याची सुविधा बंद केली आहे, मात्र ॲपवर काढलेले जुने पास त्यांचा कालावधी संपेपर्यंत वैध राहतील. भारतीय रेल्वेने ‘रेल वन’ हे नवीन ॲप सुरू केलं असलं, तरी ‘यूटीएस’ ॲप बंद करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं. ‘रेल वन’ ॲ पूर्णपणे कार्यान्वित करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं राबवली जात असून, प्रवाशांनी अफवांवर विश्वास करू नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
Site Admin | January 6, 2026 7:21 PM | Railway | UTS App
‘यूटीएस ॲप’ १ मार्चपासून पूर्णपणे बंद?