पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल, असं प्रतिपादन विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ऊसशेतीसाठी कृत्रिम तंत्रज्ञान या विषयावर नागपूर इथे एग्रोव्हीजन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळेत गडकरी यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. योग्य तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि संशोधन यांच्या सहाय्याने विदर्भातला शेतकरी नक्कीच प्रगती करू शकेल असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला. शेतकऱ्याचे उत्पादन थेट बाजारात जाऊन त्याला चांगला भाव मिळण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | July 6, 2025 7:31 PM | Nagpur | Nitin Gadkari
पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल-मंत्री नितीन गडकरी
