डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात सांगितलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेतर्फे आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर महानगरपालिकेमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला पुरवलं जातं. पेंच, कोराडी, खापरखेडा या प्रकल्पातल्या राखीव पाण्याचा वापर आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. कचऱ्यापासून बायो-सीएनजीची निर्मिती शक्य असून महानगरपालिकेनं आता आपल्या ताफ्यातल्या वाहनांमध्ये अशा इंधनाचा वापर सुरू करावा, अशा सूचनाही