अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे लागलेल्या वणव्यामुळे ९२ हजारांहून अधिक जणांना सक्तीचं स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले असून अन्य ८९ हजार जणांना स्थलांतराचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरात वणव्यामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण बेपत्ता आहेत. या परिसरात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे वणवा पसरत गेल्याने ४० हजार ५०० एकरहून अधिक जमिनीचं नुकसान झालं आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या काही भागात वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ही आग अमेरिकेच्या इतिहासातली आतापर्यंतची सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती ठरेल अशी भीती कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी व्यक्त केली आहे.
Site Admin | January 14, 2025 1:12 PM | US Wildfires
US : लॉस एंजेलिस इथं लागलेल्या वणव्यामुळे ९२ हजारांहून अधिक जणांना सक्तीचं स्थलांतर