डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा इशारा दिला आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून ट्रम्प यांनी, इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांना पदच्युत करण्याची कारवाई न करता अमेरिका त्यांना जीवे मारू शकते मात्र सद्यस्थितीत अमेरिका अशा प्रकारची कारवाई टाळत असल्याचे म्हटले आहे. नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत यासाठीच अमेरिका कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे म्हटलं आहे. इराणला बिनशर्त आत्मसर्मपण करण्याचे आवाहन करून त्यांनी खमेनी कुठे लपले आहेत, याची माहिती अमेरिकेला आहे, मात्र त्यांना मारण्याचा सध्या विचार नसल्याचे संदेशात म्हटले आहे. जी ७ परिषदेतून लवकर माघारी परतलेल्या ट्रम्प यांनी तेहरानमधील साडेनऊ दशलक्ष रहिवाशांना तेहरानमधून बाहेर पडण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर हे संदेश प्रसारीत केले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.