अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स येत्या २१ तारखेपासून भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. व्हान्स यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भेटीत व्हान्स २१ तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. व्हान्स जयपूर आणि आग्र्यालाही भेट देणार आहेत. या भेटीमुळे भारत-अमेरिका संबंधांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची संधी मिळणार आहे.
Site Admin | April 17, 2025 2:20 PM | India | J. D. Vance | US Vice President
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स येणार भारत दौऱ्यावर
