अमेरिकेत टेक्सासमध्ये आलेल्या महापुरात २४ जणांचा मृत्यू

अमेरिकेत, टेक्सासमध्ये आलेल्या महापुरात २४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी मध्य टेक्सासच्या अनेक काउंटीज मध्ये  आपत्कालीन परिस्थिती  घोषित केली असून, शोध आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु राहील असं म्हटलं आहे. 

 

टेक्साध्ये गेल्या गुरुवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या संपूर्ण प्रदेशात सरासरी ४ ते ८ इंच, तर  काही भागात १५ इंच पाऊस पडला. पूरग्रस्त भागात आणखी पाऊस पडेल असा अंदाज असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं.