जगभरातल्या देशांवर लादलेल्या सीमाशुल्कामुळे अमेरिकेला ६०० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त महसूल मिळणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या धोरणामुळे अमेरिकेची आर्थिक स्थिती सुधारली असून, राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत झाल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र दुसऱ्यांदा स्वीकारल्यावर ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाचं प्रमुख साधन म्हणून सीमाशुल्काचा वापर केला असून, भारतासह जगभरातल्या अनेक देशांकडून होणाऱ्या आयातीवर मोठ्या प्रमाणात शुल्क लादलं आहे.