डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 6, 2025 8:25 PM | US Tariffs

printer

अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादलं

रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यानं अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादलं आहे. यासंदर्भातल्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्वाक्षरी केली. गेल्याच आठवड्यात त्यांनी विद्यमान करांच्या व्यतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय उद्यापासून लागू होईल. आजच्या आदेशामुळं यामुळं भारतातून अमेरिकेत निर्यात होण्याऱ्या वस्तूंवर एकूण अतिरीक्त ५० टक्के कर द्यावा लागेल. 

 

भारतानं किंवा रशियानं धोरणात बदल केला तर किंवा परिस्थिती बदलली तर आज लागू केलेलं अतिरीक्त शुल्कात बदल करण्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केलं आहे.