स्मार्टफोन, संगणकावर अमेरिका आयात शुल्क लावणार

स्मार्टफोन, कम्प्युटर, सेमीकंडक्टर आणि त्यांच्या सुट्या भागांवर येत्या १-२ महिन्यात अमेरिका स्वतंत्र आयात शुल्क लावणार आहे. औषधी उत्पादनांच्या आयातीवरचे, विशेषतः चीनमधून होणाऱ्या आयातीवरचे शुल्क वाढवण्याचाही अमेरिकेचा विचार आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी काल ही माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आयात शुल्कातून वगळण्याचा निर्णय अमेरिकेनं जाहीर केला होता. या उपकरणांच्या चिप आणि टीव्हीचे भाग दक्षिण आशियाई देशातून आयात करण्याऐवजी अमेरिकेतच उत्पादित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.