अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशी वस्तूंवर ३५ टक्के नवीन कराची घोषणा केली आहे. हा कर १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. या आधी एप्रिलमध्ये अमेरिकेनं बांगलादेशी वस्तूंवर ३७ टक्के कराची घोषणा केली होती. याचा जास्त फटका बांगलादेशाच्या कपड्यांच्या व्यापाराला बसेल कारण मुख्य प्रतिस्पर्धी व्हिएतनामचा दर २० टक्के आहे. या निर्णयाचा उद्देश बांग्लादेश आणि इतर देशांशी व्यवहारांतून व्यापार अडथळे काढून टाकणं हा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बांगलादेशाचे वित्त सल्लागार डॉ. सालेहुद्दिन अहमद यांनी चर्चांद्वारे कराचा दर कमी केला जाऊ शकतो अशी आशा व्यक्त केली आहे.
Site Admin | July 9, 2025 1:07 PM | Bangladeshi goods | US Tariff
बांगलादेशी वस्तूंवर ३५ टक्के नवीन कराची अमेरिकेची घोषणा
