सिरियामधल्या आय एस अर्थात इस्लामिक स्टेट गटांविरोधात कारवाई तीव्र करताना त्यांच्यावर जोरदार हल्ले केले असल्याची कबुली अमेरिकेनं दिली आहे. अमेरिकेच्या सशस्त्र दलांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं संरक्षण सचिव पिट हेग्सट यांनी म्हटलं आहे. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि तोफांच्या मदतीनं मध्य सीरियाच्या काही भागांत जोरदार हल्ले चढवल्याचं त्यांनी सांगितलं. आय एस नं या महिन्याच्या १३ तारखेला पाल्मायरा शहरात केलेल्या हल्ल्यात दोन अमेरिकी सैनिक आणि २ नागरिकांचा मृत्यू ओढावल्यानं अमेरिकेनं हे जोरदार हल्ले चढवल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सीरियानंही अमेरिकेबरोबर आपलं वाढतं सहकार्य असून दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आणि याबाबत आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे.
Site Admin | December 20, 2025 1:41 PM | US Syria
अमेरिकेकडून सीरियातल्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात तीव्र हल्ले