डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले धोका संपेपर्यंत सुरूच राहतील: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

अमेरिकेच्या जहाजांसाठी धोका असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांची बंडखोरी थोपवण्यासाठी अमेरिकेचे हल्ले सुरू राहतील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांतील सतत सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे इराण समर्थित हुथी दहशतवाद्यांना रोखण्यात अमेरिकेला यश आलं आहे. असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. अमेरिकेने १५ मार्च रोजी प्रमुख सागरी मार्गांवर केमेरीन बेटानजिक अमेरिकी जहाजांना धमकावण्यासाठी हुथी बंडखोरांनी हल्ले केले. याला प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात वरिष्ठ हुथी नेत्यांना ठार मारलं असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली होती, तर ५३ लोक मारले गेल्याचं बंडखोरांच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. तेव्हापासून, बंडखोरांनी अमेरिकन लष्करी जहाजे आणि इस्रायलला लक्ष्य करणार असल्याची घोषणा केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.