स्मार्टफोन, संगणक यांना सवलत देण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेने नव्याने जाहीर केलेल्या करांमधून स्मार्टफोन आणि संगणक यांना सवलत देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या जकात आणि सीमा सुरक्षा विभागाने दिलेल्या सुचनांनुसार, अमेरिकेत आयात होणाऱ्या या दोन्ही वस्तूंसाठी बहुतेक देशांसह चीनला देखील अतिरिक्त करातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा सेमीकंडक्टर, सोलर सेल आणि मेमरी कार्डसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि घटक यामध्ये होणार आहे.