अमेरिकन संसदेत तात्पुरत्या निधीपुरवठ्याचं विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची सही झाल्याने अमेरिकेतला आतापर्यंतचा सर्वात मोठा शटडाऊन संपुष्टात आला आहे. ओबामाकेअर या आरोग्यविमा योजनेचं अनुदान वाढवण्याबद्दल डेमोक्रेटीक पक्ष आग्रही होता. त्यामुळे शटडाऊन सुरु होतं. याविषयीचा तिढा सुटत नसल्याने अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत तात्पुरता निधी पुरवठा करण्याचं बिल अमेरिकन संसेदत मांडलं गेलं. डेमॉक्रेटीक पक्षाच्या आठ सदस्यांनी रिपब्लिकनच्या बाजूने मत दिल्याने हे विधेयक मंजूर झालं. आता अमेरिकेत गेले ४२ दिवस सुरु असलेला शटडाऊन संपून सरकारी कामकाज सुरळीत सुरु होईल.
Site Admin | November 13, 2025 1:19 PM | Shutdown | US
अमेरिकेतला सर्वात मोठा शटडाऊन संपुष्टात