अमेरिकेतल्या शटडाऊन वर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं सिनेटने तडजोडीच्या एका मसुद्याला मंजुरी दिली. बहुमतासाठी आवश्यक नेमकी ६० मतं विधेयकाच्या बाजूने पडली. सर्व रिपब्लिकन खासदारांसह ८ डेमोक्रॅट्सचा कौलही विधेयकाला मिळाला. आता त्यावर संसदेची मान्यता मिळणं आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची स्वाक्षरी होणं गरजेचं आहे. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याचा, अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा आदेश, या विधेयकामुळे रद्दबातल ठरला आहे. शटडाऊनच्या तिढ्यामुळे अमेरिकेत गेले अनेक दिवस विविध क्षेत्रातलं सरकारी कामकाज ठप्प झालं होतं. यावेळचा शटडाऊन आजवरचा सर्वात दीर्घकाळ चाललेला शटडाऊन होता.
Site Admin | November 10, 2025 1:26 PM | Shutdown | US
अमेरिकेतल्या शटडाऊनवर तडजोडीचा मसुदा तयार