डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रशिया-युक्रेन युध्दबंदीसाठीच्या चर्चेला अमेरिका तयार

रशिया आणि युक्रेनदरम्यान लवकरच युध्दविरामासंदर्भात थेट चर्चा होईल आणि युध्द संपेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी समाजामाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्याक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या बरोबर दुरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनंतर दोनही देश चर्चेला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही आपण युक्रेनसोबत संभाव्य शांतता करारावर काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. रशियानं बिनशर्त युद्धबंदी करावी असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी निवेदनाद्वारे केलं आहे.

 

युक्रेन रशियासोबत तुर्की, स्वित्झर्लंड किंवा व्हॅटिकनमध्ये शांतता चर्चा करण्यास तयार आहे. असंही त्यांनी नमूद केलं आहे. तुर्कीएतील इस्तंबूल इथं नुकतीच झालेली चर्चा अयशस्वी झाल्यानंतर पुढच्या टप्प्यात शांततेसाठी नव्याने प्रयत्न केले जात आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.