डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 5, 2025 9:43 AM | Russia | US

printer

अमेरिका आणि रशिया यांच्यात दीर्घ चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दीर्घ चर्चा केली. मात्र, या त्यातून युक्रेनमध्ये तातडीनं शांतता होणार नाही, असं पुतिन यांनी मान्य केलं. तसंच युक्रेननं रशियाच्या विमानतळांवर केलेल्या हल्ल्याला रशिया उत्तर देईल असा इशाराही दिला. दोन्ही नेत्यांमध्ये 85 मिनिटं चर्चा झाली. ही चर्चा चांगली झाली, मात्र त्यातून लगेच शांतता प्रस्थापित होणार नाही, असं ट्रम्प यांनीही मान्य केलं. दरम्यान पुतिन यांनी काल सहकारी पक्षांबरोबर झालेल्या एका बैठकीत युक्रेनबरोबर सर्वसमावेशक शस्त्रसंधीची शक्यता फेटाळून लावली आणि अशी शस्त्रसंधी युक्रेनला तयारीसाठी आणखी वेळ देईल असं सांगितलं. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही रशियाचा शांतता प्रस्ताव म्हणजे इशाराच असल्याचा दावा केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.