डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 11, 2024 2:01 PM | donold trump

printer

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या दोन्ही उमेदवारांनी आज अध्यक्षीय वादविवादात भाग घेतला

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या दोन्ही उमेदवारांनी आज अध्यक्षीय वादविवादात भाग घेतला. कमला हॅरिस यांनी अर्थव्यवस्थेतल्या संधींवर भर दिला तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांच्या मुद्द्यावर हॅरिस यांचं लक्ष वेधलं. दोन महिन्यात अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे.
गेल्या ४ वर्षात अमेरिकी नागरिकांचं आयुष्य कशारितीने सुकर झालं यावर बोलताना हॅरिस यांनी नागरिकांना आणि छोट्या व्यावसायिकांना द्यायच्या मदतीच्या आगामी काळातल्या योजनांची माहिती दिली. अब्जाधीश आणि मोठ्या कंपन्यांच्या करात कपात केल्याबद्दल त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले. देशभर विक्रीकर लावण्याच्या योजनेची आणि आयातीवरील शुल्क वाढवण्याच्या योजनांची पाठराखण ट्रम्प यांनी केली.
अमेरिकी काँग्रेसनं गर्भपातासंदर्भातलं विधेयक मंजूर केलं तर पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करायची तयारी हॅरिस यांनी दाखवली. ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आले तर गर्भपातावर बंदी आणतील, असा दावा त्यांनी यावेळी केला. गर्भपातावर निर्बंध आणण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत ट्रम्प यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.