व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास माडूरो यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्याचवेळी, व्हेनेझुएलामध्ये अमेरिकी लष्कर तैनात करायचा पर्याय अद्यापही खुला असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेनं व्हेनेझुएला आणि मेक्सिकोमधून काम करणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांवर कारवाईसाठी कॅरिबियनमध्ये लष्कराचं प्रमाण वाढवल्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये व्हेनेझुएलाचे अनेक खलाशी मृत्यूमुखी पडले आहेत.
Site Admin | November 18, 2025 7:17 PM | US President Donald Trump | Venezuela President
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकी लष्कर तैनात करायचा पर्याय अद्यापही खुला-डोनाल्ड ट्रम्प