December 23, 2024 1:26 PM | Sriram Krishnan

printer

अमेरिकेचे कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठीचे सल्लागार म्हणून भारतीय नागरिक श्रीराम कृष्णन यांची निवड

अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणारे डोनाल्ड ट्र्म्प यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठीचे सल्लागार म्हणून भारतीय नागरिक श्रीराम कृष्णन यांची निवड केली आहे. ते अमेरिकन सरकारच्या कृत्रिम बुद्धीमत्ता धोरणासाठीचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. श्रीराम कृष्णन यांच्यावर व्हाईट हाऊसच्या कृत्रिम बुद्धीमत्ता आणि क्रिप्टो झार क्षेत्रात नवीन धोरण ठरवण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे.  चेन्नईमध्ये जन्मलेले श्रीराम कृष्णन हे भारतातून पदवी घेतल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झाले होते.