डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गाझा पट्टी ताब्यात घेऊन तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

अमेरिका युद्धग्रस्त गाझा पट्टी ताब्यात घेण्याची आणि तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू आणि ट्रम्प काल व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रदेशातल्या आर्थिक विकासामुळे इथल्या नागरिकांना अमर्यादित रोजगार आणि घरं उपलब्ध होतील असा दावा त्यांनी केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे संयुक्त राष्ट्र संस्थेमार्फत पॅलेस्टिनी निर्वासितांना भविष्यात दिल्या जाणाऱ्या निधीवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर भविष्यातील जागतिक संघर्ष रोखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यासाठी मदत केली होती. मात्र संयुक्त राष्ट्र संस्था या अमेरिकेच्या हितसंबंधांविरुद्ध काम करत असून त्यांच्या मित्र देशांविरुद्ध प्रचार करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.