अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाने एक गुप्तचर अहवाल उघड केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणच्या अण्वस्त्र सुविधा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, या ट्रम्प प्रशासनाच्या दाव्याचं या अहवालात खंडन करण्यात आलं आहे. अमेरिकन संरक्षण गुप्तचर संस्थेचा अहवालानुसार या हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रमाला काही महिने विलंब होणार असल्याचं दोन आघाडीच्या अमेरिकन माध्यमांनी उघड केलं आहे. तसंच हल्ल्यांपूर्वी इराणच्या समृद्ध युरेनियम साठ्याचा बराचसा भाग हलवण्यात आला होता असंही अहवालात उघड झालं आहे. ट्रम्प यांनी माध्यमांवर राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप केला आहे. इराणच्या अण्वस्त्र सुविधांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे विश्वसनीय पुरावे सीआयएनं गोळा केले असल्याचं सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी ट्रम्प प्रशासनाच्या दाव्याचे समर्थन करताना म्हटलं आहे.