अफगाणिस्तानमधील बागराम हवाई तळ ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काल सांगितलं. अमेरिकेनं या तळावरचं नियंत्रण सोडल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं होतं. हा विमानतळ चीनच्या अण्वस्त्र केंद्रांच्या जवऱळ असल्यामुळं अमेरिकेला त्याच्यावर नियंत्रण हवं आहे असं ट्रंप म्हणाले. ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टार्मर यांच्यासह लंडनमध्ये पत्रकार परिषदेत ट्रंप बोलत होते. अमेरिकेनं अफगाणिस्तानवरचा ताबा सोडणं हा अमेरिकेच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचंही ट्रंप म्हणाले. दरम्यान, गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धविराम जाहीर करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावावर अमेरिकेनं काल पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर केला.
Site Admin | September 19, 2025 10:16 AM | US President Donald Trump
अफगाणिस्तानमधील बागराम हवाई तळ ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू
