अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कडक इशारा दिला असून, गाझामध्ये बंदिवान असलेल्या सर्व ओलिसांची तत्काळ सुटका करण्याची आणि मृतदेह परत करण्याची मागणी केली आहे. व्हाईट हाऊसने दहशतवादी गटाशी थेट वाटाघाटी सुरू असल्याची पुष्टी केल्यानंतर काही तासांतच हा इशारा देण्यात आला. हा इशारा म्हणजे अमेरिकेच्या धोरणात बदल घडवून आणणारं एक पाऊल आहे. त्यांनी इस्रायलला हमासला संपवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच जर ओलिसांची सुटका केली नाही तर हमासचा एकही सदस्य सुरक्षित राहणार नाही असा इशाराही दिला आहे
Site Admin | March 6, 2025 10:05 AM | US President Donald Trump
अमेरिकेचा हमासला कडक इशारा
