डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडावर लादले अतिरीक्त कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर १० टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली आहे. तसंच काल रात्री, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी येत्या मंगळवार पासून कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के कर लावणार असल्याचं स्पष्ट केलं. या महिन्यात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर याआधीच १० टक्के कर लावण्यात आला आहे.  अमेरिकेत फेंटानिल या औषधाचा प्रवाह रोखण्यासाठी पुरेशी कारवाई झालेली नसून चीनमध्ये तयार होणार हे औषध कॅनडा आणि मेक्सिकोमार्गे अमेरिकेत येतं असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. मेक्सिको आणि कॅनडा यांनी सीमा सुरक्षा सुधारण्यासाठी आणि ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत तर त्यांच्यावर कर लावले जातील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.  

 

यामुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. सेन्सेक्स तेराशे हून अधिक अंकांनी घसरुन ७३ हजार २०० अंकांच्या आसपास व्यवहार करतो आहे. निफ्टी सुमारे ४०० अंकांची घट नोंदवून २२ हजार १०० अंकांच्या जवळ आहे.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.