अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुत्र हंटर बायडेन यांना दिली माफी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने जो बायडेन यांनी पुत्र हंटर बायडेन यांना माफी दिली आहे. बेकायदा शस्त्र बाळगणे आणि करविषयक गुन्ह्यांबाबत खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याच्या आरोपाखाली हंटर बायडेन यांना दोषी ठरविण्यात आलं आहे. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं बायडेन यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या माफीचा निषेध केला आहे. हा न्यायव्यवस्थेचा भंग असल्याचं म्हटलं असून ६ जानेवारीच्या कॅपिटल दंगलखोरांसारख्या इतरांनाही अशीच माफी मिळेल, का असा सवाल केला आहे.