अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या आय़ुष शेट्टीने पटकावलं आहे. हे त्याचं बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धेतलं पहिलं पदक आहे. तर भारताला परदेशात पुरुष एकेरीत दोन वर्षांनंतर विजेतेपद मिळालं आहे. आयोवा राज्यातल्या कौन्सिल ब्लफ्स इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात त्याने कॅनडाच्या ब्रायन यांगचा 21-18, 21-13 असा पराभव केला.
महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अमेरिकेच्या बेइवेन झांगबरोबर तिला 21-11, 16-21, 21-10 असा पराभव पत्करावा लागला. तथापि बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेली सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरण्याचा विक्रम १६ वर्षीय तन्वीच्या नावे जमा झाला आहे.