September 8, 2024 8:52 PM | US Open Badminton

printer

अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या अरीना सबालेंका अजिंक्य

अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या अरीना सबालेंका हिनं अजिंक्यपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिच्यावर ७-५, ७-५ अशी सरळ सेट्समध्ये मात केली आणि कारकीर्दीतलं तिसरं ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपद पटकावलं. 

तत्पूर्वी पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्प्सन या जोडीनं जर्मनीच्या जोडीचा सरळ सेट्समध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत आज अमेरिकेचा टेलर फ्रित्झ याच्यासमोर अग्रमानांकित इटलीच्या यानिक सिनरचं आव्हान असेल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.