अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असं आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दिलं. अमेरिका दौऱ्यादरम्यान शेलार यांनी कॅलिफोर्नियातल्या सॅनफ्रान्सिस्को इथं मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. अमेरिकेत अशा ५०पेक्षा जास्त शाळा असून स्थानिक प्रशासनाला महाराष्ट्र शासनाने शिफारस केली, तसंच अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला, तर मराठी भाषा शिकवणं, परीक्षा आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणं सोपं होईल, असं मत या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलं. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून आवश्यक ते सहकार्य, शिफारशी आणि अभ्यासक्रम नक्की देऊ, असं आश्वासन शेलार यांनी दिलं.
Site Admin | July 25, 2025 3:04 PM | Marathi Schools | US
अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम मिळणार
