अमेरिकेने निर्यात नियंत्रण यादीतून भारताच्या तीन आण्विक संस्थांवरचे उठवले निर्बंध

अमेरिकेनं भारताच्या भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय दुर्मीळ पृथ्वीविज्ञान केंद्र आणि इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र या तीन संस्थांवरचे निर्बंध उठवले आहेत. अमेरिकेच्या उद्योग आणि सुरक्षा विभागानं ही घोषणा केली. शीतयुद्धाच्या काळात लादण्यात आलेले हे निर्बंध अमेरिकेच्या परदेशी धोरण उद्दिष्टांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं हटवण्यात आल्याचं या विभागानं म्हटलं आहे. हे निर्बंध उठवल्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक संयुक्त प्रयत्नांना बळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या निर्बंधांच्या यादीत 11 चिनी कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.