January 13, 2026 7:50 PM | Iran | US

printer

अमेरिकेच्या कारवाईचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं इराणचं प्रत्युत्तर

इराण अमेरिकेच्या कारवाईचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागाजी यांनी म्हटलं आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यापेक्षा यावेळी इराण अधिक सुसज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं. आर्थिक अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर इराणमधे सध्या सरकारविरोधी निदर्शनं तीव्र झाली असून सरकार निदर्शकांवर बळाचा वापर करत आहे. यात आतापर्यंत दोन  हजार जण मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे.