December 24, 2025 2:57 PM | US | US H-1B visa

printer

अमेरिकेच्या H1-B व्हिजासाठीच्या निवड प्रक्रियेत बदल

अमेरिकेच्या एच वन बी व्हिजा साठीच्या निवड प्रक्रियेत अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मोठे बदल केले आहेत.  त्यानुसार यापुढे एच वन बी व्हिजा साठी लॉटरी व्यवस्था बंद करून त्याऐवजी अधिक उच्चशिक्षित आणि जास्त पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांना अधिक चांगलं वेतन आणि रोजगाराच्या संधी मिळू शकतील, असं अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने म्हटलं आहे. 

 

आजवर या व्हिजा साठीच्या लॉटरी व्यवस्थेचा गैरवापर अमेरिकन कंपन्यांनी फक्त कमी पगारावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत आणण्यासाठी केला होता, आता नव्या व्यवस्थेतून अधिक उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना अमेरिकेत आणण्यासाठी अमेरिकन कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचं काँग्रेसचं उद्दिष्ट पूर्ण होईल, असं अमेरिकन नागरिकत्व सेवेचे प्रवक्ते मॅथ्यू ट्रेगेसर यांनी म्हटलं आहे.