डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 7, 2025 2:39 PM | USA

printer

अमेरिकेत कालही अनुदान विधेयकावर सहमती न झाल्यानं शटडाऊन कायम

अमेरिकेमध्ये सरकारी कामकाज चालवण्यासाठी निधी मंजूर कारण्याबाबतचं विधेयक अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात काल मंजूर झालं नाही. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षांनी ही कोंडी सोडवण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरीसाठी आवश्यक असलेली ६० मतं मिळाली नाहीत. त्यामुळे अमेरिकेतलं सरकारी कामकाज सलग सातव्या दिवशी बंद राहिलं. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शटडाऊनसाठी डेमोक्रॅट्स जबाबदार असल्याचं समाज माध्यमांवरच्या  पोस्ट मध्ये म्हटलं आहे.