अमेरिकेच्या टेक्सासमध्ये गेल्या काही दिवसांपासून आलेल्या पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०० वर पोहोचली आहे. मृतांमधील बहुसंख्य केरी काऊंटी या भागातले आहेत. मॅस्टिक ख्रिश्चन शिबिरातल्या २८ मुलींचाही या पूरामुळे मृत्यू झाला असून यात २८ लहान मुलांचाही समावेश आहे. ग्वाडालुपेनदीच्या किनाऱ्यावर धोक्याचा इशारा देणारे सायरन लावण्यात आले असते तर मृतांची संख्या कमी झाली असती असं अमेरिकेच्या प्रशासनानं म्हटलं आहे. पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्याआधी या भागात सायरन लावले जातील असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हवामान संस्थेच्या निधीत कपात केल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनांची आगाऊ सूचना देता आली नसल्याच्या आरोपांचा व्हाईट हाऊसनं इन्कार केला आहे.
Site Admin | July 8, 2025 1:41 PM | US Flood
अमेरिकेत पुराचा हाहाकार ! १०० लोकांचा मृत्यू