अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हनं आपल्या कर्जावरच्या व्याजदरात पाव टक्के कपात करून ते ३ पूर्णांक ७५ शतांश ते ४ टक्के दरम्यान राखण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. व्याजदर कपातीमुळे प्रमुख कर्ज दराचं उद्दिष्ट तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आलं आहे. त्यामुळे अमेरिकेत कर्जावरचा खर्च कमी झाला आहे.
अमेरिकेतलं सरकारी कामकाज महिनाभर बंद राहिल्यामुळे केंद्रीय बँकांना कामगार बाजारपेठेबद्दल अधिकृत डेटा मिळायला विलंब झाला आणि त्यामुळे ही कपात झाल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे.