अमेरिकेची फेडरल रिझर्व्हने आधारभूत व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आपला आधारभूत व्याजदर ४.२५ ते ४.५० टक्के या श्रेणीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरल रिझर्व्हने २०२५ या वर्षासाठी अमेरिकेचा महागाईचा दर जास्त, तर आर्थिक विकास दर कमी राहील असा अंदाजही वर्तवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर उसळलेल्या जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हनं २०२५ या वर्षाचं  दुसरं पतधोरण जाहीर केलं आहे.