अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह संस्थेनं अल्प मुदतीसाठीच्या व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार व्याज दरात कपात करण्याचं आवाहन करुनही या वर्षात सलग पाचव्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्यात आले. गेल्या वर्षी व्याजदरात तीन वेळा कपात करुन तो सुमारे 4 पूर्णांक 3 दशांश टक्के करण्यात आला.
Site Admin | July 31, 2025 9:57 AM
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह संस्थेकडून सलग पाचव्यांदा व्याजदर स्थिर