डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून पीट हेगसेथ यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब

अमेरिकेच्या सिनेटने पीट हेगसेथ यांच्या अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठी झालेल्या मतदानात हेगसेठ यांच्या नियुक्तीच्या समर्थनार्थ आणि विरोधात समसमान मते पडली. त्यानंतर उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी सिनेटचे अध्यक्ष म्हणून निर्णायक मत दिल्यावर, हेगसेथ यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले. हेगसेथ यांच्या नियुक्तीला डेमोक्रॅट्स आणि काही रिपब्लिकन सदस्यांनी विरोध केला होता, त्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा विजय मानला जात आहे.