अमेरिका आणि कॅनडा यांच्यातल्या वाढत्या तणवाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाकडून आयात होणाऱ्या मालावर १० टक्के अतिरिक्त कर लादायचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल घेतला. या मालावर आधीपासून लागू असलेल्या करा व्यतिरिक्त हा कर वसूल केला जाईल, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. अमेरिका लादत असलेल्या कराला विरोध करण्यासाठी कॅनडानं चालवलेल्या मोहिमेदरम्यान अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं वापरल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी नुकताच कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापारी चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही चर्चा पुन्हा सुरू करायची कॅनडाची तयारी असल्याची भूमिका कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी मांडली आहे.
Site Admin | October 26, 2025 1:46 PM
कॅनडाकडून आयात होणाऱ्या मालावर अतिरिक्त १० टक्के कर लादायचा अमेरिकेचा निर्णय