अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्या उत्सुक असल्याचे हँकी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.राज्यात ऊर्जा, नव तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नवनवीन क्षेत्रामधील सहयोगाबद्दल तसंच ऊर्जा क्षेत्रात संधी, विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीत नवतंत्रज्ञानाचा वापरावर दोघांमध्ये चर्चा झाली.
Site Admin | February 4, 2025 3:52 PM | अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट
