इस्राईल आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढत असून दोन्ही देश एकमेकांच्या पायाभूत सुविधा केंद्र आणि रहिवासी वस्त्यांवर हल्ले करत असल्याने संघर्षाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेच्या नागरिकांनी तात्काळ इराणमधून बाहेर पडावं असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, इराणनं इस्राइलबरोबरचा संघर्ष थांबवावा आणि अणु कार्यक्रमाच्या मुद्दयावर चर्चा करावी असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांच्या संघर्षात इस्राइलला कुठलीही प्रत्यक्ष मदत करणार नसल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
इस्राइलनं हवाई हल्ले थांबवावे याकरता अमेरिकेनं हस्तक्षेप करावा असं आवाहन इराणनं केलं आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षकांच्या प्रमुखांनी इराणच्या सर्वात मोठ्या युरेनियम समृद्धीकरण केंद्राचं मोठं नुकसान झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.