डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 30, 2025 2:42 PM | China | Tariff | US

printer

चीनवरचं आयात शुल्क कमी करण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेनं चीनवर लादलेलं आयात शुल्क सध्याच्या ५७ टक्क्यांवरून ४७ टक्के इतकं कमी केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज घोषित केलं. दक्षिण कोरियामध्ये बुसान इथं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली. चीन अमेरिकेडून सोयाबीनची खरेदी तात्काळ सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुर्मीळ खनिजांचा प्रश्न सोडवण्यात आला असून, चीनमधून होणाऱ्या दुर्मीळ खनिज निर्यातीत आता कोणताही अडथळा येणार नाही, असं ते म्हणाले. चीनवर लावलेलं रासायनिक पदार्थांवरचं सीमाशुल्क २० टक्क्यावरून १० टक्क्यावर आणल्याचंही त्यांनी सांगितलं.