अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या H-1B Visa प्रणालीसाठी आता 88 लाख रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यासंदर्भातील घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील परदेशी कामगारांचा अमेरिकेत येण्याचा ओघ कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
या व्हिसावर इतर देशांमधून कामगार आणण्यासाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांना दरवर्षी प्रति व्हिसा हे शुल्क भरावं लागेल आणि स्थानिक अमेरिकी नागरिकांपेक्षा हे परदेशी नागरिक अधिक कुशल असल्याचं सुनिश्चित करावं लागेल असं व्हाईट हाऊसचे कर्मचारीविषयक विभागाचे सेक्रेटरी विल शार्फ यांनी याबाबत बोलताना सांगितलं.