डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 16, 2025 1:36 PM | Baisakhi | US

printer

अमेरिकेत प्रथमच वैशाखीचा सण साजरा

अमेरिकेत ऑलिंपिया इथल्या स्टेट कॅपिटलमध्ये प्रथमच वैशाखीचा सण साजरा करण्यात आला. सिएटलमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वॉशिंग्टन राज्याचे गव्हर्नर, मंत्री तसंच वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या शीख समुदायाचे प्रमुख सदस्य उपस्थित होते. वॉशिंग्टन राज्याचे गव्हर्नर बॉब फर्ग्युसन यांनी शीख समुदायाने अमेरिकेत दिलेल्या योगदानाचं आणि वैशाखी सणाच्या आयोजनाचं कौतुक केलं. तसंच, ग्रेटर सिएटल क्षेत्रात १४ एप्रिल हा दिवस वैशाखी दिन म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा केली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.